महात्मा राजा रावण यास विनम्र अभिवादन व भोजनदान.. 

ऋषी सहारे 

  संपादक

गडचिरोली – विजयादशमीच्या औचित्य साधून महात्मा रावण यास विनम्र अभिवादन करण्यात येऊन भोजन देण्यात आले.

        दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी मौजा राजोली पोटेगाव, तालुका जिल्हा गडचिरोली येथे सामाजिक कार्यकर्ते विनोद मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण आदिवासी जमातीचे श्रद्धास्थान, आदिवासी सम्राट, महात्मा राजा रावण मडावी यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

         याप्रसंगी महात्मा राजा रावण मडावी यांचा जयजयकार करण्यात आला आणि सर्व गावकरी मंडळी यांनी सामूहिकरीत्या भोजन करण्यात आले.

          याप्रसंगी राजोली येथील बिरसा मुंडा समितीचे पदाधिकारी गाव भुम्या पत्रुजी सिडाम, विठ्ठल कुळमेथे, सरपंच कांता हल्लामी, पोलीस पाटील वामन बांबोळे, गोवर्धन मडावी, कोमल जुमनाके, नामदेव जुमनाके, मनोहर मडावी, विजय जुमनाके, हितराज कुसराम, रवींद्र कुमरे, रत्नमाला ईष्ठाम, गीता सिडम, रूपा जुनाके, रोहित कुमरे, राजू सीडाम, अमोल पदा, सोम कुमरे, राजोली येथील महीला व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.