भारताच्या संविधानाची ( डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित ) जागृती का आणि कशासाठी?  — आणि EVM +VVPAT ला विरोध का आणि कशासाठी? याचे उत्तर पुढीलप्रमाणे अग्रलेखात…. — पूर्वार्ध…

भारताच्या संविधानाची ( डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित ) जागृती का आणि कशासाठी?

 — आणि EVM +VVPAT ला विरोध का आणि कशासाठी?

याचे उत्तर पुढीलप्रमाणे अग्रलेखात….

— पूर्वार्ध…

         “देशातच नव्हे तर जगात दोन शक्ती,गेल्या सुमारे 5000 वर्षांपासून एकमेकांसमोर दंड थोपटून उभ्या आहेत.एक शक्ती कुटनीतीची आहे.

       तर दुसरी विज्ञानवाद + विवेकवाद = म्हणजेच मानवतावादाची विवेकशक्ती आहे.

     या दोन शक्तिपैकी एका कुटनीती शक्तीचा जन्म अमानवीय,कृत्रिम दानवी अहंकारातून झालेला असून, तीची अनैतिक तत्वे ही साम, दाम, दंड ,दंड आणि भेदाच्या अनैतिक तत्वावर आधारलेली आहेत.

         तर विवेकवादाचा जन्म निसर्ग नियमांच्या तत्वज्ञानातून झालेला आहे.तर तीची नीतीमूल्ये ही स्वातंत्र्य,समानता,न्याय आणि बंधुता या निती मूलभूत तत्वावर आधारलेली आहेत.

           कुटनीतीचा उगम हृदयाला मारून टाकून भ्रष्ट मेदूतून होतो.आणि मादक पदार्थाच्या सेवनाच्या अतिरेकामुळे त्याला प्रोत्साहन मिळून, मानवातील ‘ दानवी वृत्ती ‘ वृद्धिंगत होते.

       याउलट विवेकशक्तीचा उगम हा निसर्गाने प्रदान केलेल्या निरागस हृदयातून होऊन, मानवता धर्माला प्रोत्साहन देणारी संजीवनी ठरतो.

      विवेक शक्ती उत्क्रांतीतून रक्तहीन क्रांतीला जन्माला घालते.तर कुटनीतीतून क्रांतीला शह देण्यासाठी रक्तरंजित प्रतीक्रांतीचे समर्थन करुन प्रोत्साहन देऊन तसे करायला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या भाग पाडते.

        हा या दोन्ही परस्पर विरोधी एक विधायक आणि दुसरी विघातक शक्तीतला हा फरक आहे. शिवाय या दोन्ही शक्तीतला संघर्ष जागतिक स्तरावर येनकेन प्रकारे,गेल्या इ. स. पूर्व.2350 च्या एरुकागिणाच्या प्रथम सुधारणावादी क्रांतिपासून आजतागायत चालू आहे.

        विधायक शक्तीत संपूर्ण सजीवसृष्टीचे कल्याण निर्जीव सृष्टीच्या साहाय्याने कसे साधता येईल हा सम्यक विचार आणि उद्दिष्ट व ध्येय दडलेले आहे.

      तर याउलट निसर्गाने प्रदान केलेल्या मेंदूच्या बळावर ( हृदया व्यतिरिक्त ) मानव इतर संपूर्ण सजीवसृष्टीला आपले गुलाम बनवावे,शेवटी मानवातील उच्चं – नीच भेद निर्माण करुन,त्यांनाही हतबल करुन,आपले इतर प्राण्यांप्रमाणे गुलाम बनवून आपणच सर्वशक्तिमान व्हावे.आणि कुसांस्कृतीच्या आधारे म्हणजेच ‘मनुस्मृतीच्या ‘ आधारे इतर सर्वाना आपले गुलाम बनवावे.त्याचप्रमाणे जगातील इतर देशात

       “सोफेस्टिकेटेड ” कुसंस्कृती निर्माण करुन ( कुटनीती आणि सोफेस्टीकेटेड या दोन्ही कुसंस्कृतीचे अर्थ,उद्देश आणि ध्येय एकच आहेत ) ही मानसिकता निर्माण करून तीला प्रोत्साहन देऊन बळकटी आणण्याची शक्ती या “कूटनीतीत “आहे.

      म्हणून अल्पसंख्यांक विरुद्ध बहुसंख्यांक यांच्यातील संघर्ष जगाच्या पटलावर सुमारे 5000 वर्षांपासून आजतागायत चालू आहे.

       या दोन्ही शक्तीतला संघर्ष अर्वाचिन काळात प्रथम 1776 च्या अमेरिकन राज्यक्रांतीतून उफाळून वर आला.इंग्लंड आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाची बीजे साम्राज्यवादात आहेत.साम्राज्यवादाची निर्मितीच एक राष्ट्र दुसऱ्या कमजोर राष्ट्राला आपले गुलाम बनविते.म्हणजेच या कूसंस्कृतीचा अर्थ या अर्वाचिन काळातील पहिल्या रक्तरंजित क्रांतीत सामावलेला आहे.

        या अर्वाचिन काळातील अमेरिका इंग्लंड यांच्यातील पहिल्याच रक्तरंजित संघर्षात जरी लोकशाहीवादी मूल्ये म्हणजेच स्वातंत्र्य,समानता,न्याय आणि बंधुता ही मूलभूत नितिमूल्ये स्थापन करण्याचा जरी प्रयत्न झालेला असला,तरी या स्थापन करण्याच्या पद्धतीला रक्ताचा डाग असल्यामुळे ही क्रांती सुद्धा केवळ 75 वर्षेच टिकली.आणि पुन्हा एकदा याच अमेरिकेची शकले पडून दक्षिण आणि उत्तर अमेरिकेची निर्मिती झाली.परंतू याही वेळी अब्राहम लिंकन सारख्या लोकशाहीवादी महापुरुषाने लोकशाही वाचविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.या काळात सुरुवातीला युद्ध शांत होईपर्यंत रक्तरंजित रणकंदन झालेले असले,तरी सुद्धा या अमेरिकेने त्यानंतर मात्र रक्ताचा डाग न लागू देता, लोकशाही मूल्ये कशी अविष्कारीत करता येतील यावर जोर देत प्रयत्न केले.तेंव्हापासून आजतागायत 100% तर नाही पण जगाच्या तुलनेत सर्वात जास्त प्रयत्न अमेरिकेने केलेले आहेत.

          या क्रांतीनंतर फ्रेंच राज्यक्रांती,रशियन राज्यक्रांती, पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध आणि इतर सर्वच जगातील लहान मोठे वाहिलेले रक्ताचे पाट हे केवळ आणि केवळ कुटनीती विरुद्ध विवेक शक्ती यांच्यातील संघर्षातूनच म्हणजे अल्पसंख्यांक विरुद्ध बहुसंख्यांक यांच्यातील संघर्षामुळे वाहिलेले आहे..

       रक्तरंजित वाहिलेल्या पाटातून लोकशाही मूल्ये म्हणजेच स्वातंत्र्य समानता,न्याय आणि बंधुता ही नितिमूल्ये कधीच स्थापून अविष्कारीत होऊ शकत नाहीत,हेच या अर्वाचिन काळातील क्रांत्यामुळे स्पष्ट झाले.

परंतू हीच नितीमूल्ये…..

      तथागत भगवान बुद्धानी ज्ञानप्राप्ती करुन धम्मक्रांतीतून रक्त न सांडता स्थापन करुन अविष्कारीत सुद्धा करुन दाखविलेली आहेत ..

आणि याच आधारावर…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी…..

    “लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणणारी,परंतू रक्ताचा एकही थेंब न सांडता. अशी शाही म्हणजे लोकशाही ” ही लोकशाहीची व्याख्या त्यांनी केलेली आहे…

     म्हणून तथागताची धम्मक्रांती आणि बाबासाहेबांची संविधानक्रांतीच लोकशाहीला वाचवू शकते म्हणूनच….

     देशाला संविधान जागृतीची व तीच्या अविष्कारितेची आवशकता आहे…

( टीप :- या लेखाचा उत्तरार्ध उद्याच्या भागात..)

           जागृतीचा लेखक

             अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689