नवदुर्गा नवरात्र उत्सव पायी ज्योतीचे आळंदीत स्वागत….

दिनेश कुऱ्हाडे 

उपसंपादक                        

आळंदी : नवदुर्गा नवरात्र उत्सव समिती कार्ला ते छत्रपती संभाजी नगर जाणाऱ्या नवरात्र दुर्गा ज्योतीचे तिर्थक्षेत्र अलंकापुरी नगरीत माऊली मंदिरात विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ज्योतीचे पुजन करण्यात आले.

           यावेळी शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब पेठकर, ऋतिक काठोळे, उमेश महाराज बागडे, सचिन शिंदे, नितीन ननवरे, राजेश नागरे तसेच जागृती नवदुर्गा नवरात्र उत्सव समितीचे पदाधिकारी एकनाथ बाबा मोकासे, ज्ञानेश्वर ओपळकर, रामचंद्र सुरडकर, नाना मोकासे, निवृत्ती टोपे, गणेश मोकासे, बापू मोकासे, शंकर धनवाई, पांडू आप्पा मोकासे, रवी मोकासे, योगेश मोकासे, सुनील गुरळकर, महेंद्र मोकासे, अशोक गुराळकर, बबलू राजे मोकासे आदी मान्यवर उपस्थित होते.

         यावेळी सुमारे 200 नवदुर्गा नवरात्र उत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर तसेच श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथ, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाप्रसाद आळंदी संस्थांच्या वतीने देण्यात आला. नवदुर्गा नवरात्र ज्योत आळंदी मंदिरात प्रदक्षिणा करून छत्रपती संभाजी नगरकडे पायी मार्गस्थ झाली.