ऋषी सहारे

संपादक

 

 

         गडचिरोली जिल्ह्यातील अनेक लोकांचे जीव घेणारा नरभक्षी सिटी-१ वाघास अखेर वन विभागाला देसाईगंज लगत वळूमाता प्रक्षेत्रात आज सकाळी दि. १२/१०/२२ ला जेरबंद करण्यात यश आले.

    देसाईगंज-वडसा नव विभागातील वनपरिक्षेत्रा अंतर्गत वावरत व मानवी जीवास अत्यंत धोकादायक ठरलेला नर वाघ जेरबंद करण्यास व गरजेप्रमाणे तज्ञांचे उपस्थित पर्यावरण व वन मंत्रालय भारत सरकार यांचे मार्गदर्शन सुचने प्रमाने गडचिरोली चे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर , देसाईगंज चे उपवन संरक्षक धर्मराज सालविठ्ठल,सहाय्यक मनोज चव्हाण, धनजय वायभासे,अविनाश मेश्राम, विजय धांडे, व त्यांचे सर्व सहकारी मागील दहा दिवसात अथक परिश्रम घेऊन वाघास जेरबंद करण्यात आले.

या वाघाने आदल्या दिवशी वळूमाता क्षेत्रात गाईला ठार मारले होते. त्याच शिकारी जवळ दुसरे सावज बांधून वाघास आकर्षित केले. रात्रभर बंकर केज मध्ये बसून वाघावर पाळत ठेवली.वाघ मारलेल्या शिकारी जवळ येताच बंकर केज मध्ये तैनात डॉ. आर.एस.खोब्रागडे, पशूवैद्यकिय अधिकारी वन्यजीव तथा आर. आर.टी.प्रमुख ए.सी.मराठे शाँर्पशुटर राकेश अहुजा,वगैरेनी क्षणाचा विलंब न लावता तात्काळ बंदुकीतून डाँर्ट मारुन वाघास बेशुद्ध करून केले.आणि शुध्दीवर येण्यापूर्वी पिंजऱ्यात बंद करण्यात आले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com