उपसंपादक/अशोक खंडारे
आष्टी येथील विघालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या चपराळा परीसरातील विघार्थ्यांना जीवघेणा प्रवास करत शिक्षण घ्यावे लागते आहे.
चपराळा ते आष्टी रोडची अशी चाळण झाली आहे की, जीव मुठीत घेऊन शाळा गाठावी लागत आहे तर कधी वाहक बसमधून विघार्थ्यांना खाली
उतरवून खड्डे पास करून पुन्हा बस मधे बसवून घेऊन शाळा गाठून देत आहेत त्यामुळे शाळेत वेळेवर पोहचता येत नाही.
सदर रस्त्याचे काम तातडीने दुरुस्ती करावे जेणेकरून विघार्थी वेळेवर शाळेत पोहोचतील अपघात होईस्तोवर वाट न बघता लवकरात लवकर रोडची दुरुस्ती करावी अशी मागणी ईल्लूर,ठाकरी, कुनघाडा (माल), चपराळा येथील पालकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.