पारशिवनी :- 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतातील पेरण्या व पिकांचे मोठे नुकसान झाले होते . पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई राज्य सरकारकडून दिली जात आहे . शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे अनुदान शासनातर्फे कार्यालयात जमा झाले आहे . ही भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयामार्फत सुरू झाली आहे . ज्या बाधित शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची व बँक खात्याची माहिती संबंधित पटवारींना दिली नाही , अशा शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आणि आधार कार्डची छायाप्रत ( झेरॉक्स ) संबंधित पटवारी व तहसील कार्यालयात तत्काळ जमा करावी . विशेष बाब म्हणजे ज्या 7/12 मध्ये एकापेक्षा जास्त नावे आहेत , त्यामध्ये एकाच व्यक्तीच्या नावाने सर्वांचे संमतीपत्र असणे बंधनकारक आहे . अनुदान एका व्यक्तीच्या खात्यात जमा केले जाईल , अशी माहिती पारशिवनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली .