श्री.सुनिल जाने यांचा शिक्षकदिनी गौरव…  

        अबोदनगो चव्हाण  

जिल्हा प्रतिनिधी अमरावती/काटकुंभ

               दखल न्युज भारत 

अमरावती :- शिक्षण विभाग जिल्हा परिषद द्वारा अमरावती येथे मातोश्री विमल‌ताई देशमुख सभागृह शिवाजी नगर अमरावती येथे सन 2023-24 चा जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा ५ सप्टेंबर रोजी अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेत पार पाडला.

         त्यात एकूण 16 शिक्षाकांचा सत्कार करण्यात आला. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी 1 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामिदा येथील शिक्षक श्री सुनिल भुराजी जाने यांचा सहपरिवार मुख्यकार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा मैडम यांचा हस्ते गौरव पूर्ण सत्कार करण्यात आला.

          श्री सुनिल जाने सर हे मागील सात वर्षापासून मेळघाटच्या अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कामीदा येथे अध्यापणाचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे.मेलघाटातील नियुक्ती म्हटली की टाळाटाळ न्यायलयात धाव असे प्रकार नेहमी घडतात.

          मात्र कामीदा येथील श्री सुनिल जाने सर हे जरा वेगळे आहेत, ते विद्यार्थाना आपल्या मुलाप्रमाणे जपून शिक्षण देत आहे.ते नेहमी विद्यार्थांचा सहवासात राहून ज्ञानदानाचे पवित्र कार्य निस्वार्थपने,प्रमाणिकपने करत आहे. शैक्षणिक कार्याबरोबरच ते सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर आहेत.

           तंबाखू मुक्त अभियान स्वच्छता अभियानात प्रामुख्याने सहभागी होऊन गावकर्यांना सुद्धा मार्गदर्शन करतात.अपंगाना व वयोवृद्ध लोकांना कपड़े वाटप व इतर मदत करून सामाजिक दायित्व निभवत आहे.त्यांचा कार्याची प्रशंशा मेलघाट परिसरात नेहमीच होत असते.

           या सोहळ्याला अतिरिक्त कार्यकारी अधिकारी श्री.संतोष जी जोशी,वित्त अधिकारी अश्विनी मारने मैडम,डायट चे प्राचार्य मिलिंदजी कुबड़े, डेप्यूटी सी.ई. वो. डॉ.कैलाश घोड़के, शिक्षण अधिकारी प्राथमिक श्री बुद्धभूषणजी सोनवणे साहेब,शिक्षण अधिकारी माध्यमिक प्रिया ताई देशमुख मैडम,निखिलजी मानकर शिक्षण आधिकारी योजना,गटशिक्षण अधिकारी श्री.रामेश्वर जी माळवे,गट शिक्षण अधिकारी श्री .संदीपजी बोडखे ,शिक्षण विभागतील इतर अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.