
ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय आश्रम शाळेवर घड्याळी तासिका तत्वावर काम करणाऱ्या कंत्राटी शिक्षकांना T.A. व D. A. लागू करण्यात यावे या करीता आझाद समाज पार्टी गडचिरोलीच्या वतीने प्रकल्प अधिकाऱ्याला पत्र देण्यात आले होते.
सदर मागणी धोरणात्मक व निर्णयात्मक दृष्ट्या रास्त आणि कंत्राटी शिक्षकांचे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी आवश्यक असल्याने प्रकल्प अधिकारी यांनी अप्पर आयुक्त नागपूर कार्यालयाला पुढील कार्यवाहीस सादर केली.
त्याबद्दल आज 13 सप्टेंबर रोजी पत्र प्राप्त झाले.त्याबद्दल asp ने आभार मानले आहे.पण,जर T.A.D.A. वर अप्पर आयुक्त यांनी सकारात्मक भूमिका न घेतल्यास याविरोधात तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल.
तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांनी यासाठी तयार राहावे असे आव्हान करण्यात आल्याचे समजते.