ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव माजी राज्यसभेत खासदार कॉम्रेड सिताराम येचुरी यांना आरमोरीत डाव्या आघाडीच्या व इंडिया आघाडीचा वतीने शहिद भगतसिंग चौकात आदरांजली वाहण्यात आली.कॉम्रेड. सिताराम येचुरी हे भारताच्या राजकारणातील एक मोठ चेहरा होते. त्याची राजकीय वाटचाल विद्यार्थी असतांनाच सुरू झाली होती.
ते विद्यार्थी आंदोलनात सक्रिय होते. भारतातील सामाजिक, आर्थिक विषयांवर त्याचा दांडगा अभ्यास होता. राहुल गांधी सारखे राष्ट्रीय नेते सुध्दा देशातील समस्यावर त्याच्या शी चर्चा करायचे. त्यांच्या मुत्यू मुळे डाव्या पक्षांनी मोठी हानी झाली आहे.मुत्यु नंतर त्याचा देह एम्स रुग्णालयात दान करण्यात आले.
आदरांजली वाहण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. डॉ. महेश कोपुलवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदिप ठाकुर, कॉग्रेस पक्षाचे डॉ.आशिस कोरेटी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे शुभम पाटील, नितीन भोवते तसेच प्रशांत खोब्रागडे, मिनाक्षी सेलोकर, योजना मेश्राम,अंकुश गाढवे,सांरग जाबुळे, श्रीकांत आतला, भगवान राऊत,किशन राऊत,जियाअली खान इत्यादी सहकारी उपस्थित होते.