मंगला ठक्क यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आदोलन…

 

   सैय्यद जाकिर

जिल्हा प्रतिनिधी वर्धा..

        हिगनघाट : गत दी.१० सप्तेंबर २०२४ पासून तहसील कार्यालय हिगनघाट जी.वर्धा महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरिक व निराधारांचे अत्याचार मुक्ति संघर्ष समितीच्या मंगला ठक यानी निराधार,शेतकरी व असंगठित वर्गाला न्याय देन्यासाठी बेमुदत धरने आदोलनाची शुरुवात केली.या वेडी निराधार महिला पुरुष उपस्थित होत्या.

         तसेच या धरने आदोलनला अनेक सामाजिक संघतनेने पाठिंबा दिला.त्यांनी शासन /प्रशासनास केलेल्या मांगन्या खालील प्रमाणे…

१,) ५५ वर्षा वरील वयोवृद्ध निराधार व शेतकऱ्यांना ५००० रुपये महीना मानधन मिळावे.

२) निराधारांची उत्पन्न मर्यादा २१००० हजार वाढ करुन ५० हजार करण्यात यावी..

३) घर तेथे शौचालय त्या प्रमाणे प्रत्येक राशन कार्ड धारक महिलांना प्रत्येक घरी एक सिलाई मशीन मिळावी,जेन्हे करुण त्यांना घरगुती उद्योग करता येइल..

 ४) शेतकऱ्यांच्या शेत मालाचा हमीं भावाचा कायदा करने बाबत..

५) शहरी व ग्रामीण भागात झोपड़पट्टीत राहणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी पट्टे मिळणे बाबत.. .

६) जबरानजोत शेतकऱ्यांना व जमीन धारकाला कायम स्वरूपी जमिनीचे पट्टे देने बाबत.

      सामाजिक कार्यकर्त्या मंगला ठक्क यांचे नेतृतवात निराधार,शेतकरी व असंगठीत वर्गाचे धरने आदोलन तहसील कार्यालय हिगनघाट येथे बेमुदत करण्यात येत आहे.

        शेतकरी,किसान समितिचे निशिकांत शिंगरू,चिंतामन दारूंकर,दिवाकर आसोले,गजानन भोमाले,शेषराव भोयर,गीता भगत, व अनेक पुरुष,माता भगिनींनी या धरणे आदोलनात हजेरी लावली.