दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
दारू निती घोटाळ्यातंर्गत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने आज जमानत दिली असून ते आता कारागृहाच्या बाहेर येणार आहेत.
२१ मार्चला अरविंद केजरीवाल यांना ईडीने दारु निती घोटाळ्यातंर्गत अटक केली होती.इडीच्या अटकेला अनुसरून त्यांना जमानत मिळाली होती.
मात्र,लागलीच सिबिआय ने त्याच प्रकरणात अटक करून अरविंद केजरीवाल यांचे कारागृहातील दिवस वाढविले होते.
अखेर १३ सप्टेंबर २०२४ ला सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १० लाख रुपयांच्या बाॅऊंडवर जमानत दिली आहे.
अरविंद केजरीवाल हे कारागृहातून बाहेर येणार ही बातमी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळताच त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.