गेल्या 60 वर्षांपासून देशाच्या व राज्याच्या निवडणुकीत केवळ कुटनीतीचे राजकारण……… — त्यात आम्ही भारतीय जनता कुठे?      भाग — 2 ….

        देशाच्या परकीय आक्रमण काळाच्या इतिहासात सुद्धा लोकशाहीची बीजे रुजलेली होती.ते सुद्धा आजच्या लोकशाहीतील परिस्थितीला लाजवीणारे होते.1440 ते 1445 या पाच वर्षाच्या काळात सूरी वंशाचा शेरशहा नावाचा आक्रमण कर्ता राजा होऊन गेला.त्याच्या केवळ पाच वर्षाच्या कार्यकळात या भारत देशात एकाही खून किंवा चोरीच्या घटनेची नोंद नाही..

      एखादा वाटसरू सोन्याचे गाठोडे घेऊन झाडाखाली निवांत झोपत असे..

        आज जे राष्ट्रीय महामार्ग आहेत,त्यातील पहिल्या (क्रमांक 1 असलेल्या ) राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती शेरशहा सूरी याने केलेली आहे.

          आज आपण ज्या चलनी संपतीची मोजदाद रुपयात करतो, त्या रुपयाची निर्मिती सुद्धा याच शेरशहानी केलेली आहे.

         त्याच्या कार्यकाळात त्याने जेवढी देशांतर्गत मार्ग बनविले होते,त्या प्रत्येक मार्गावर ठराविक अंतरावर प्रवाशासाठी सरकारी आरामदायी गृहे सर्वसोयीयुक्त अगदी मोफत लाभासाठी,सर्वासाठी निर्माण केली होती!

        विशेष म्हणजे हा राजा गुप्तपणे आपल्या राज्यात अचानक वेशांतर करून कुठेही जाऊन राज्य कार्यपद्धतीची तपासणी करत असे,त्यामुळे,त्याचे सर्व अधिकारी 24 तास सतर्क असत!

      अशा प्रकारे,परकीय आक्रमणकर्त्यांच्या काळात का होईना आम्ही ( भारतीय जनतेनी ) लोकशाहीचा अनुभव अल्पकाळ का होईना अनुभवला आहे.

            परंतू,आज आम्ही ( भारतीय जनता ) संविधान आणि संसदीय लोकशाही भारतात येऊन 75 वर्षे होऊन सुद्धा त्या शेरशहा राजाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील एक दिवस तरी आम्ही अनुभवत आहोत का?

        हा प्रश्न प्रत्येकाने आपापल्या सदसदविवेक बुद्धीला विचारायला हवा!

त्याचप्रमाणे……

     सम्राट अशोक यांनी सुद्धा आपल्या प्रत्येक अधिकारी आणि सेवकांना सक्त ताकीद देऊन ठेवले होते की,सर्वसामान्य नागरिक जर तक्रार घेऊन माझ्याकडे आला,आणि मी झोपेत जरी असलो…

         तरी ताबडतोब ही गोष्ट माझ्या कानावर आली पाहिजे…

     अशा राजांच्या कार्यकाळातल्या गोष्टी जर लोकशाही येऊन सुद्धा जर घडत नसतील तर आम्ही स्वातंत्र्यानंतर काय मिळविले?

  हा प्रश्न आम्हाला पडतो?.

     केवळ निवडणुका आल्या की सर्वच राजकीय पक्षांकडून घोषणाचा पाऊस….

       आणि मतदान संपले की, बेरीज – वजाबाकी आकडेवारीच्या खेळातून सत्तेवर कुणीतरी येतो,संविधानातील वाटा-पळवाटा शोधून राज्य करतो,घोषणाचा पाऊस अवकाळी पावसावाणी लगेच गायब होतो…

     अशीच आम्ही गेली 70 वर्षे घालविली आहेत..

      हे व असे कुठपर्यंत चालणार किंवा चालू देणार?

    यासाठी आम्ही संविधानातून कधीतरी जागृत होणार आहोत का नाही?

          जागृतीचा लेखक

             अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689..