अबोदनागो चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
मोटार सायकल चोरी करणाऱ्या श्री.भारत मक्कु धोजे याला स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहे.आरोपीचे वय २६ वर्ष असून तो रा.सलोना,ता. चिखलदरा,जिल्हा अमरावती येथील रहिवासी आहे.
अमरावती ग्रामीण पोलीस अधिक्षक श्री.विशाल आनंद यांनी,अमरावती ग्रामिण हददीत वाढत्या मोटर सायकल चोरीच्या घटनाना आळा बसविण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा,अमरावती ग्रामिण येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करुन गुन्हे उघडकिस आणणे कामी सुचना निर्गमीत केल्या होत्या.
त्या अनुषंगगाने पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.श्री.किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले होते.
दिनांक ११/०९/२०२४ रोजी स.पो.नि.सचिन पवार व त्यांचे पथकातील अमंलदार हे अचलपुर उपविभागात पेट्रोलीग करित असतांना त्यांना गोपनिय माहीती मिळाली कि,ग्राम सलोना येथे राहणारा एक इसम नामे भारत मक्कु धोत्रे हा चोरीची मोटर सायकल विक्री करण्याकरीता लोकांना विचारपुस करीत आहे.
तो सध्या चिखलदरा कडुन धामनगाव गढी कडे काळया रंगांची पेंशन प्रो गाडी घेवून येत आहे.मिळालेल्या माहीतीचे ठिकाणी सापळा रचुन त्यास पंचासमक्ष ताब्यात घेतले व मोटर सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले कि, मी व माझा मित्र (फरार) असे दोघांनी मिळून हि मोटर सायकल कुषी उत्पन्न बाजार समिती अचलपुर येथुन चोरी केल्याची कबुली दिली.
याचबरोबर त्याचे ताब्यातुन १ काळया रंगाची ग्रे पटटा असलेली हिरो कम्पनीची पेंशन प्रो मोटार सायकल क्रमांक एम. एच.२७,बि.एस.६९५८ असलेली कि.अं. २५०००/- रु. ची जप्त करण्यात आली असुन नमुद मुददेमाल व आरोपी पुढील कार्यवाही करीता पोलीस ठाणे अचलपुर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
याप्रमाणे पोलीस ठाणे अचलपुर येथील अपराध क्रमांक २४७/२०२४ कलम ३०३ (२) बिएनएस.नुसार गुन्हा उघडकिस आणला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.विशाल आनंद (भा.पो.से.),अप्पर पोलीस अधिक्षक श्री.पंकज कुमावत (भा.पो.से.) अमरावती ग्रामिण यांचे मार्गदर्शनात श्री.किरण वानखडे,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अम.ग्रा. यांचे नेतृत्वात सहा.पोलीस निरीक्षक सचिन पवार,पोलीस अमंलदार युवराज मानमोठे,रविन्द्र व-हाडे,स्वप्निल तंवर,सागर नाठे,शांताराम सोनोने,चालक राजस सायबर अंमलदार शिवा शिरसाट यांनी केली.