मिलिंद विद्यालयात पालक सभा…

 

युवराज डोंगरे/खल्लार 

     उपसंपादक

         नजिकच्या गौरखेडा येथील मिलिंद विद्यालयात शिक्षक-पालक सभा नुकतीच संपन्न झाली. पालक सभेच्या अध्यक्षस्थानी राहुल व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती चे सचिव क्षितिज अभ्यंकर हे होते. तर पालक प्रतिनिधी म्हणून घडा येथील प्रतिष्ठित नागरिक व पालक संतोष तायडे, महिला पालक प्रतिनिधी म्हणून किरणताई सदाशिव, प्रमुख पाहुणे म्हणून गाडगेबाबा पतसंस्था परतवाडा चे अध्यक्ष प्रा उद्धव कोकाटे, राजू हरणे व विद्यालयाचे मुख्याध्यापक अमितकुमार वानखडे हे उपस्थित होते. पालक सभेमध्ये अनेक पालकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. व समस्या सुद्धा सांगितल्या.

            या समस्यांचे निवारण करण्यासाठी सर्व संबंधित शिक्षक कर्मचारी यांनी पालकांना अभिवचन दिले. पालक सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अमितकुमार वानखडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दिपक कावरे यांनी मानले. व सूत्रसंचालन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अमोल बोबडे यांनी केले. पालक सभा यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत वानखडे, पुरणप्रकाश लव्हाळे, वासुदेवराव भांडे, कुमारी मनिषा गावंडे, अमोल बोबडे, दिपक रहाटे, आनंद खंडारे, संजय आठवले, मुमताज पठाण, गणेश अंभोरे व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.