आरमोरी येथील रामसागर तलावाची स्वच्छता करा… — युवारंग लोकहीत संघर्ष संघटनेची मागणी….

 

प्रितम जनबंधु

संपादक 

           आरमोरी :- शहरातील प्रसिद्ध व जागृत दुर्गा माता मंदिर जवळील राम सागर तलावाची स्वच्छता तत्काळ करावी दिनांक १८ सप्टेंबर २०२३ ला शहरातील महिला भगिनी हरितालिकेच्या पूजेसाठी व विसर्जनासाठी रामसागर तलावाच्या परिसरात एकत्र येऊन हरितालिकेचे विसर्जन करतात. ही बाब लक्षात घेऊन नगरपरिषदेने तत्काळ राम सागर तलावाची स्वच्छता करावी अशी मागणी निवेदनाद्वारे युवारंग लोकहित संघर्ष संघटना, आरमोरी तर्फे करण्यात आली.

            याप्रसंगी युवारंग लोकहीत संघर्ष संघटनेचे पदाधिकारी देवानंद भाऊ दुमाने, विभाताई बोबाटे, आशाताई बोडणे, उमाताई कोडापे, महानंदा शेंडे, ज्योती बघमारे, आशुतोष गिरडकर प्रामुख्याने उपस्थित होते.