“आय लव्ह यू,म्हणणाऱ्या दोन बहादूराना अटक.. — शाळेत जाताना काढायचे मुलीची छेड…

 

 सुरज मेश्राम

तालुका प्रतिनिधी

कुरखेडा :-

       वर्ग नऊ मध्ये शिकणारे विकृत विद्यार्थी शाळेत जाताना मुलीचा पाठलाग करुन,”आय लव्ह यू,म्हणत छेड काढायचे.

              सदर दोन्ही तरुणांना १२ सप्टेंबरला पोलिसांनी जेरबंद केले.ही घटना कुरखेडा शहरात घडली.त्या दोन्ही विद्यार्थ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी कारागृहात झाली.

              वैभव जांभुळकर (२२) व रेवननाथ दूधकुंवर २२, दोघे रा. आंधळी , नवरगाव अशी आरोपींची नावे आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी नववीत शिकत आहे.

           शाळेत जाताना हे दोन तरुण तिचा दुचाकीवरुन पाठलाग करत.आम्ही प्रेम करतो,तू सुध्दा प्रेम कर,असे म्हणत ते तिची नेहमी छेड काढत.मुलांचे भविष्य खराब होवू नये म्हणून अत्याचार ग्रस्त मुलीने सुरवातीला दुर्लक्ष केले,पण रोजच त्यांच्याकडून त्रास सुरु झाल्याने,तिने मन घट्ट करुन आपबिती कुटुंबाला सांगितली व १२ सप्टेंबरला कुरखेडा ठाण्यात फिर्याद दिली.

           विनयभंग व बाललैंगिक अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा नोंद झाल्यावर पो.नि.संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यह निरीक्षक दिनेश गावंडे यांनी दोघांनाही अटक केली.

           न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली,त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी झाली,अशी माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली.