आयटक चे सी. ई. ओ व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन … जानेवारी पासूनचे थकीत वाढीव मानधन त्वरित देण्याची मागणी अन्यथा तीव्रआंदोलन…- कॉ.झोडगे

ऋषी सहारे

संपादक

चंद्रपूर :–आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर

च्या वतीने आशा व गटप्रवर्तकांचा शिष्ट मंडळ कॉ विनोद झोडगे राज्य सचिव आयटक, आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव कॉ निकिता निर,वर्षा घुमे,सविता निखाडे,सुंनदा मुलमुले,पार्वती बदकी,वैशाली आत्राम, शारदा तेलंग ,मनीषा देवगडे,मंगला मडावी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ द्वारे जिल्हा परिषद कार्यालयात 

विवेक जांशन मुख्यकार्यकारी अधिकारी व डॉ. गहलोत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन विविध स्थानिक मागण्या विषही चर्चा करण्यात आली.जानेवारी ते एप्रिल 2023 चे वाढीव मानधन त्वरित देणार असल्याचे मान्य केले. सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या , केंद्रीय अर्थ संकल्पात पुरवणी बजेट मध्ये तरतूद करून आशा वर्कर ला 18000 /-रु .व गटप्रवर्तक महिलांना दरमहा रूपये २५०००/– हजार किमान वेतन द्या,कंत्राटी कर्मचारी यांचे प्रमाने सुसूत्रीकरणात गटप्रवर्तकांचा समावेश करा व त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्या प्रमाने वेतन व भत्ते द्या , आरोग्य खात्यातील रीक्त पदावर ५० % जागा पात्रतेनुसार आशा व गटप्रवर्तक महिला मधुन भरा , वर्धिनी आरोग्य केंद्रातील जानेवारी 2023 पासूनचे थकीत मानधन व नियमित मिळणारा थकीत मोबदला /मानधन ताबडतोब अदा करा व या पुढे नियमीत दरमहा ५ तारखेच्या आत माणधन अदा करा .ग्राम पंचायत स्तरावरून कोरोना संपे पर्यंत मागील मे 2020 पासून मासिक 1000 रु प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय आहे तेव्हा त्याची सर्वत्र अमलबजावणी करून त्वरित देण्यात यावी दर महिन्याला वेतन चिटी देण्यात यावे,संघटने सोबत दर महिन्याला तालुका व जिल्हा स्तरावर समस्या निवारण बैठक घेण्यात यावी आयुष्मान भारत योजने अंतर्गत सर्व काम आशा वर्कर करीत नाही म्हणून त्यांना कामावरून कमी करण्याची ग्राम पंचायत कडून धमकी दिल्या जाते किंवा काही ठिकाणी तसे पत्र पण दिले आहे ते त्वरित रद्द करण्याचे आदेश देण्यात यावे. तसेच त्यांनी केलेल्या त्या कामाचा मोबदला ग्राम पंचायत मार्फत त्वरित अदा करा एप्रिल 2022 ते मार्च 2023 LBW (कमी वजनाची बालके)यांचा मोबदला त्वरित जमा करून,यापुढे पूर्वी प्रमाणे या कामाचा मोबदला पूर्वी प्रमाणे सुरू ठेवण्यात यावा.आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी यांना वीणा मोबदला कोणतेही कामे सांगू नये. राजुरा सह अन्य तालुक्यातील टी.बी.रोगावरील केलेल्या कामाचा मोबदला 2020 ते 2023 पर्यंत अदा करण्यात यावा.जिल्हा रुग्णालय येथील आशा घर नेहमी स्वछ ठेवण्यात यावा.ब्रम्हपुरी तालुक्यात माता बैठक दर महिन्याला तीन वेळा घेण्याचा दबाव आणल्या जात आहे तेव्हा पूर्वी प्रमाणे तीन महिन्यातून एकदा घेण्यात यावी. गट प्रवर्तक यांचा एप्रिल पासूनचा थकीत मानधन त्वरित देण्यात यावा. आशा व गट प्रवर्तक मधून आरोग्य विभागात 50 टक्के जागांची भरती करा त्यांना पगारी सुट्टी,किरकोळ रजा,बाळंत पणाच्या पगारी रजा लाजू करा . आशा व गट प्रवर्तक यांच्या कुटुंबातील सर्व सदक्ष यांची आरोग्य तपासणी शासकीय सेवेतून मोफत करण्यात यावी. आशा गट प्रवर्तक यांना सामाजिक सुरक्षा लागू करा.राज्य सरकारने आरोग्य अभियानातील कर्मचारी प्रमाणे आशा व गट प्रवर्तक यांना वेतन सुसुत्री करणा मध्ये सामाविष्ट करा .प्रसूती करिता आशा गरोधर मातेसह असल्यास ती प्रसूती शाशकिय किंवा प्रायव्हेट दवाखान्यात झाली तरि आशा ला प्रसुतीपूर्व व प्रसूती पश्यात सर्व मोबदला अदा करण्यात यावा.प्रमुख मागण्यासह अन्य मागण्या विषही यावेळी चर्चा करण्यात आल्या.

        स्थानिक मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्रआंदोलनाचा इशारा आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे व जिल्हा सचिव कॉ.निर यांनी दिला आहे.