ऋषी सहारे
संपादक
कूरखेडा-
बौद्ध समाज मंडळ कूरखेडा व समता सैनिक दल यांचा वतीने आज शूक्रवार रोजी तपोभूमि तळेगाव रोड कूरखेडा येथे वर्षावास धम्म श्रवण सभा निमीत्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी सर्वप्रथम तपोभूमि येथे सकाळी बौद्ध बांधवांचे एकत्रीकरण व येथील प्रागंणात धार्मिक पंचरंगी ध्वजा रोहण भंते संघधातू यांचे हस्ते करण्यात आले यानंतर भंतेजी चा नेतृत्वात शहरात भव्य धम्मरॅलीचे आयोजन करण्यात आले होते तसेच सांयकाळी भंते संघधातू यांनी धम्म उपदेश करीत उपस्थीत बौद्ध बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी भंतेजीचा हस्ते तपोभूमि येथे बोद्धीवृक्षाची विधीवत लागवट सूद्धा करण्यात आली याप्रसंगी भारतीय स्टेट बैंक शाखा कूरखेडा चे व्यवस्थापक योगेश्वर डोंगरवार माजी जि प सदस्य प्रल्हाद कराडे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ फूलचंद रामटेके,कृषी अधिकारी संजय रामटेके,हिरा वालदे, महेन्द्र माने समता सैनिक दलाचे मूक्ताजी दूर्गे , पंकज डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे सेवानिवृत्त शिक्षक रमेश बोरकर शिक्षक हेमंत मेश्राम, जगदिश सहारे, प्रशांत जोगे, अनिल शहारे, खुशाल लाडे, नितिन जोगे, खेमराज धोंडणे,दिपक धारगाये व समस्त नवयुवक बौद्ध समाज बांधव तथा तालुका बौध्द समाज एकोप्यानी येऊन हजारोच्या संख्येत उपस्थीत होते.