ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली– बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली व गोंडवाना विध्यापिठाच्या संयुक्त विध्यमाने स्थानिक सुमानंद सभागृहात जागतिक आदिवासी दिन व गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी गोंडवाना विध्यापिठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांना आदिवासी सेवक(महाराष्ट्र शासन) पुरस्काराने शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आश्रम शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अंकित व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन,माल्यार्पण व दिप प्रज्वलीत करून झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन रासेयोचे संचालक डॉ. श्याम खंडारे,अ.ज.प्र.त समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष जितेंद्र चौधरी, उपसंचालक दिगांबर चव्हाण, वरीष्ठ संशोधन अधिकारी गजानन फुंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. सविता सादमवार तर आभार साहाय्यक प्रकल्प अधिकारी चंदा मंगर यांनी मानले.