ऋषी सहारे

संपादक

 

 

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात या देशातील विषमता सपली नाही. बेरोजगारी, भुकमरी,दारीद्र्य,शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही संपल्या नाहीत. विरोधकाचा आवाज दडपशाहीने दाबल्या जात आहे.लोकशाही,अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावल्या जात आहे.या विरोधात संघर्ष करण्याची गरज आहे. शेतकरी, शेतकामगार, कष्टकरी कामगार ,युवक विद्यार्थी, यांनी संघर्ष करण्यासाठी लाल बावट्याचे नेतृत्वात एकत्र यावे.देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीय कम्युनिस्ट पार्टी चे फार मोठे योगदान असुन ,स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांच्या स्वप्नतील समाजवादी भारत घडवू या.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी गडचिरोली च्या त्रैवाषिक जिल्हा अधिवेशनात ते 

अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले.

 गडचिरोलीभारतीय कम्युनिस्ट पार्टी चे त्रैवाषिक जिल्हा अधिवेशन काँ.हरीपाल खोब्रागडे परीसरातील काँ.शिवदास उठाने, विचार मंच, बल्हारपुरे हाँल आरमोरी येथे दि.११सप्टेंबर २०२२रोज रविवारी संपन्न झाले. सर्वप्रथम भाकपा झेंड्याचे ध्वजारोहण करुण अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली.विचार मंचावर उदघाटन ,राज्य निरीक्षक काँ.शाम काळे,राज्य कार्यकारिणी सदस्य, काँ.विनोद झोडगे,राज्य कौंसिल सदस्य, अध्यक्ष डाँ.काँ.महेश कोपूलवार होते.

यावेळी काँ.नामदेव गावंडे, काँ.शिवदास उठाने,काँ.संतोष दास,गजानन बुरांडे, हरीपाल खोब्रागडे, अँड.मनोहर ताकसांडे यांना आदरांजली वाहण्यात आली. तर जेष्ट नेते काँ.चंद्रभान मेश्नाम यांचा शाल श्नीफळ देवून सत्कार करण्यात आला.

उदघाटन काँ.शाम काळे म्हणाले सरकारच्या जनविरोध्दी धोरणा विरुद्ध लढण्यासाठी भारतीय कम्यपार्टी ने पक्ष मजबूत करण्याचे आवाहन केले. तसेच केंद्रातील मोदी सरकार हे नव उदारवादी धोरणे राबवित आहे,यामुळेच देशात महागाई, बेकारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी, डाव्या पक्षाची एकजूट करून ,येत्या निवडणूकीत भा.ज.प.चा पराभव करण्याचे आवाहन केले.

     अमरावती येथे दि.राज्याचे अधिवेशन.१८त२० दरम्यान तर राष्ट्रीय अधिवेशन विजयवाडा येथे दि.१४ते१८आँक्टोंबर ला होत आहे.यात जाण्यासाठी प्रतिनिधी निवडण्यात आले.सदर अधिवेशनात नवीन जिल्हा कौंसिल ची निवड करण्यात आली. जिल्हा सचिव काँ.देवराव चवळे, जिल्हा सहसचिव अँड.काँ.जगदिश मेश्नाम, कोषाध्यक्ष मीनाक्षी सेलोकर,

कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी काँ.संजय वाकडे, काँ.प्रकाश खोब्रागडे, काँ.सुरेश सोनटक्के, मनोज दामले, अमोल दामले.इ.परीश्नम केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News