दिक्षा कऱ्हाडे
संपादिका
तिन दिवसांपासून येणारा पाऊस अखेर आज थांबल्याने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कमी दिवसात उत्पादन देणारा सोयाबीन जवळपास अंतीम टप्प्यात आलेला आहे,काही शेतकऱ्यांचा सोयाबीन पिवळा पडत असल्याने त्यांना सदर पिकांसाठी पाऊसाची गरज नाही.तद्वतच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पराठी (कापूस) करीता आवश्यक असलेला पाऊस झाल्याने त्यांना सुध्दा सध्या जास्त प्रमाणात पाऊसाची आवश्यकता नाही.
हलक्या व मजवट धान उत्पादनासाठी आवश्यक असलेला पाऊस झाल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना समाधान देणारे चित्र आहे.
आज काही प्रमाणात पाऊसाने विश्रांती घेतली असल्याने सर्व उत्पादक शेतकऱ्यांसाठी सदर बाब दिलासादायक आहे.