शुभम पारखी
तालुका प्रतिनिधी चिमूर
चिमूर तालुक्यातील महत्त्वपूर्ण पिक म्हणजे भात पिक होय.या पिकांवर तालुक्यातील शेकडा सत्तर ते अंशी टक्के शेतकरी अवलंबून असतात.मात्र भात पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
सध्या स्थित खोड किडीचा प्रादुर्भाव भात पिकांवर दिसून येतो आहे.तद्वतच लाल्या व मावा तुडतुडाही भात पिकांना घेरत असल्याचे दिसून येत आहे.
रसात असलेल्या भात पिकांवर रोगांचा दिसणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने दक्ष होणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.