चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी

 

लाखनी

(मुरमाडी / तुप) :- लक्ष्मी शिक्षण संस्था व कीडा मंडळ केसलवाडा / वाघ द्वारा संचालित स्व. निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी / तुप येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व गृह अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह निमित्त सकस आहार या विषयावर मार्गदर्शन झाले,

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री भेदराज बी. ढवळे होते या कार्यक्रमामध्ये प्रा. डॉ. श्रीकांत एम. भुसारी यांनी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना सकस आहार हा चौकस असावा असे प्रतिपादन केल. सोबत कोरोना महामारी काळात रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याकरीता दैनंदिन आहारात ऋतुनुसार फळे, गावरान भाज्या यांचा समावेश करावा असे मत मांडले. मुलीनी सकस आहारा सोबतच योगा अभ्यास आणि दैनंदिन जेवनात मोड आलेल्या पदार्थांचा समावेश करावा असे गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अर्चना ए. निखाडे यांनी तरूणांनी आपल्या निरोगी स्वास्थ्यासाठी पोषक व समतोल आहार घ्यावा असे सांगितले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य भेदराज बी ढवळे यांनी भारतीय स्त्रियांना रक्तक्षय (अॅनिमिया) चा उद्भव प्रामुख्याने संतुलित आहार न घेतल्यानेच होतो. तसेच काही फळे व भाज्यांवर किटनाशकांचा वापर अतिप्रमाणात केल्याने ते खाण्यायोग्य राहत नाही व त्यामुळे विविध आजार बळावतात असे प्रतिपादन केले.

 

राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा विश्वास खोब्रागडे यांनी कुपोषण आणि त्यावरील उपाय योजना यावर विविध मार्मीक उदाहरण देवून मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जोत्सना शेळके यांनी केले तर आभार प्रा. डॉ. भुवनेश्वरी वाघाये यांनी केले. या प्रसंगी प्रा. एम.एच फुलझेले, प्रा. स्नेहा शामकुवर, प्रा. डॉ. राहुल चुटे, प्रथापाल विशाल गजभिये उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता लिपीक खेमराज वाघाये, श्रीकांत धुर्वे, अजय मेश्राम, ग्रंथालय परिचर गितेश्वरी तरोणे, महाविद्यालयीन शिपाई किशोरी ननोरे, अमर जांभूळकर, तेजेंद्र सदावर्ती, शोएब शेख, देवेंद्र मेंढे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयसेवक विद्यार्थी उपस्थित होते..

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News