नवजीवनच्या विद्यार्थ्यांची वूशू कराटे स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली :- तालुका क्रीडा संकुल भंडारा येथे झालेल्या राज्य वूशू निवळ चाचणी स्पर्धेत साकोली येथील नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) येथील खेळाडूंनी सहभागी होऊन उत्कृष्ट प्रदर्शन करीत एकूण ८ पदक प्राप्त केले. त्यामध्ये ४ सुवर्ण, 3 राजत आणि १ कास्य पदक , प्राप्त करुन नवजीवन (सीबीएसई) शाळेचे नाव उंचावून मानाचा तुरा रोवला.

        विजेत्या खेळाडूंमध्ये सुवर्ण पदक विजेते नम्रता लिल्हारे, हितांशी गिऱ्हेपूनजे, सोहन जांभुळकर, सार्थक शाहू, ब्रॉन्झ मेडल निशेष शाहू, अवनीष बहुरूपे, सोनवी जांभुळकर व कास्य पदक दिशा इटणकर यांनी राज्य वूशू स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली. विजेत्या खेळाडूंना पुनःशच पदक व प्रमाणपत्रांचे प्राचार्य मुजम्मिल सय्यद यांनी वितरण करून सर्व विद्यार्थ्यांचा गौरव, अभिनंदन व कौतुक केला.

       विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय कराटे प्रशिक्षक श्रीधर खराबे, आई वडील, प्राचार्य, प्रशासकीय अधिकारी, पर्यवेक्षिका, वरिष्ठ शिक्षिका, सतिश गोटेफोडे व समस्त शिक्षक वर्ग यांना दिले.

       सर्व नवजीवन चॅम्पियन्सचे डॉ. ब्राह्मानंद करंजेकर शैक्षणिक परिसरातील सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करुन पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.