चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधि भंडारा
ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ.सि.रा.रंगनाथन यांची जयंती/ग्रंथपाल दिन कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन प्राचार्य डॉ.डि.डि.कापसे सर, प्रमुख अतिथी प्रा.ला.ना.मेश्राम उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा.डाॅ.डि.डि.कापसे सर यांनी डॉ.रंगनाथन यांच्या जीवनावर व ग्रंथालयाची पंचसूत्री यावर प्रकाश टाकला तसेच प्रमुख अतिथी म्हणुन प्रा.ला.ना.मेश्राम यांनी रंगनाथन यांच्या ग्रंथालय वर्गीकरणावर माहिती सांगितली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विनोदकुमार रामटेके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डाॅ.स्मिता गजभिये यांनी केले सदर कार्यक्रमाला प्रा.सरैया सर, प्रा.देशमुख सर, प्रा.बा.का.रामटेके, प्रा.सु.ना.बन्सपाल, प्रा.सुनंदा रामटेके, प्रा.संगिता अरमरकर, प्रा.प्रतिभा वंजारी, प्रा.एकता जाधव व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सौ.मनिषाबाई अतकरी यांनी विशेष परिश्रम घेतले.