महिला मुक्ती मोर्चा संघटन जिल्हा संपर्कप्रमुख पदी पूजा प्रकाश पाटील यांची नियुक्ती…

       रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

 चिमूर :- महिलांवर अनेक स्तरावरून होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात निखराचा लढा देण्याकरिता महिला मुक्ती मोर्चा या संघटनेची सुरुवात करून महिलांवर अन्याय अत्याचार होऊ नये याकरिता महिला मुक्ती मोर्चा संघटन नेटाने व जोमाने झगडत आहे.

           त्यामुळे महाराष्ट्र भरातील जाती समूहाच्या महिलांचे जाती बंधन तोडून एकोपा व एकोप्यानी लढण्याकरिता महिला मुक्ती मोर्चा संघटन कार्य करीत आहे.

            तरी दिनांक 27 जुलैला महिला मुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य संचालक तथा संस्थापक अशोक जी खरात यांनी चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी पूजा प्रकाश पाटील यांची नियुक्ती केली आहे.

         यावेळी प्रदेशाध्यक्ष संगीताताई वाघ,विभागीय अध्यक्ष सागर बोरकर जिल्हा निरीक्षक चंद्रपूर योगेश रामटेके आदी प्रमुख पदाधिकरी उपस्थित होते.