ग्रंथालय शास्त्रचे जनक पद्मश्री डॉ.शि.रा.रंगनाथन यांच्या १३० व्या जयंतीचा कार्यक्रम “ग्रंथपाल दिन” म्हणून साजरा..

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

पारशिवनी :- काल सायंकाळी साडेसहा वाजता,”सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान पारशिवनी येथे,ग्रंथालय शास्त्रचे जनक पद्मश्री डॉ.शि.रा.रंगनाथन यांच्या १३० व्या जयंतीचा कार्यक्रम “ग्रंथपाल दिन” म्हणून साजरा करण्यात आला. 

     आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री रोशन तांडेकर यानी भुषविले होते तर प्रमुख अतिथि म्हणून श्री.गंगाधर राव अवचट,श्री.प्रकाशराव नाईक हे उपस्थित होते.

          सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथींनी पद्मश्री डॉ.शि.रा.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण केली व आदरांजली वाहिली.

          ग्रंथालय शास्त्रजनक पद्मश्री डॉ.शि.रा. रंगनाथन यांची जयंती “ग्रंथपाल दिन” म्हणून साजरी करण्यात येत आहे. त्यांच्या जीवनाविषयी व कार्याविषयी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी व श्री.स्वप्नील वकलकर यांनी उपस्थित सभासद व वाचकांना मोलाचे मार्गदर्शन केले. 

        या कार्यक्रमाला श्री.शुभम कावळे,श्री.विकी मेश्राम,कुमारी दक्षिणा गाते,कुमारी मयुरी इंगळे,श्री.समर्थ ढोले,श्री.राहुल पारधी, श्री.आकाश परतेकी,श्री.हेमराज सोनोने,श्री.अनिकेत दिवे,श्री.अतुल मनगटे,श्री.मनोज चिकटे आणि वाचक वर्ग उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे संचालन श्री दिनकरराव मस्के कोषाध्यक्ष यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री श्याम बारई ग्रंथपाल यांनी केले आभार प्रदर्शनानंतर सर्व उपस्थितांना अल्पोहार देण्यात आला आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.