गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सक्षम पर्याय देणार :- भाई रामदास जराते… –शेतकरी कामगार पक्षाची जिल्हास्तरीय बैठक संपन्न…

ऋषी सहारे 

   संपादक

गडचिरोली : भाजप सरकारच्या भांडवलदार धार्जिण्या जनविरोधी धोरणांना कंटाळलेल्या जनतेला नवा पर्याय हवा असून गडचिरोली विधानसभा क्षेत्रात शेतकरी कामगार पक्ष सक्षम पर्याय देणार असल्याची घोषणा शेतकरी कामगार पक्षाचे नेते व आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी केली.

           शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती समीती सदस्य भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई जराते, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, डाॅ. गुरुदास सेमस्कर, तुळशिदास भैसारे, दामोदर रोहणकर, पांडुरंग गव्हारे, गंगाधर बोमनवार, माहागू पिपरे, शोएब पटेल, अशोक किरंगे प्रामुख्याने उपस्थित होते.

            नुकताच पंढरपूर येथे पक्षाच्या पार पडलेल्या अधिवेशनात कामगार, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवकांचे रोजगार, शिक्षण, पर्यावरण अशा विविध विषयांसह सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थिती संबंधात मंजूर करण्यात आलेल्या ठरावांसबंधात भाई रामदास जराते व उपस्थितांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले.

              तसेच येणाऱ्या निवडणूका आणि पक्षाच्या विविध जन आघाड्यांच्या नव्याने पदाधिकारी निवडीसंबंधात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.  नवीन सभासद नोंदणीसह बुथ कमीट्या मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

              या बैठकीला विठ्ठल भोयर, रामकृष्ण धोटे, गोविंदा बाबनवाडे, गुड्डू हुलके, पवित्र दास, देवेंद्र भोयर, सरपंच जया मंटकवार, निशा आयतुलवार, पोर्णिमा खेवले, हेमलता मुनघाटे, अप्सरा डोईजड, कविता ठाकरे, छाया भोयर, सविता ताटलावार, मोहिनी करकाडे, शालिकराम भोयर, विजय कत्रोजवार, रामदास आलाम, मुरलीधर गोटा, ईश्वर मंगर, अजय मेश्राम, प्रदिप तुनकलवार, योगेश चापले, राजकुमार प्रधान, खुशाल भगत, सुखदेव मानकर, विलास मुनघाटे, कुमदेव गायकवाड, कैलास शिंपी, विलास भोयर, भिमदेव मानकर, आत्माराम मुनघाटे, हिराचंद कोडगले, राकेश ठाकरे, विनोद गेडाम, वसंत चौधरी, विलास अडेंगवार, उमाजी मुनघाटे, सोनाली भोयर, जयश्री कन्नाके, अंजना फुलझेले, महानंदा वैद्य, पोर्णिमा शेंडे, पोर्णिमा कांबळे, अनुष्का कोवे, सोनाली कवडो, अभिलाषा मंडोगडे, रिना शेंडे, सुरज ठाकरे, सुमीत खेडकर यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.