युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणीची बैठक शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.
नुकताच 1ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती आरक्षण उपवर्गीकरण व क्रिमिलिअर बाबत दिलेल्या असैवधानिक निर्णयासंदर्भातील भूमिका व त्याचप्रमाणे आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुक पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह नांदेड येथे दुपारी 12वाजता आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी समाजभूषण गोपाळराव आटोटे राष्ट्रीय महासचिव एड. जे.के.नारायणे ,प्रदेश अध्यक्ष गणेशभाई उनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले मराठवाडा प्रदेशाध्यक्ष गणेशराव पडघन, प्रदेश महासचिव बापूराव गजभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या महत्वपूर्ण बैठकीला राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकारी सदस्यांसह राज्यभरातून पक्षांतर्गत असलेल्या विविध विंगचे 300 पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील.
अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.