ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली: तालुक्यातील रामनगर /एकोडी येथील लाभार्थ्यांनी आज उपजिल्हाधिकारी श्रद्धा जाधव यांना वनहक्क दावे मंजूर करून पट्टा देण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले.
रामनगर येथील लाभार्थी 20 ते 25 वर्षा पासून त्याठिकाणी वास्तव्य करीत आहेत, आणि वनहक्क दावे सुद्धा तहसील कार्यालयात पाठविण्यात आले आहेत परंतु अजून पर्यत वन हक्क दावे मंजूर झालेले नाहीत त्याकरीता आज ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले , सुखराम बन्सोड यांच्या नेतृत्वात रामनगर येथील लाभार्थ्यांनी उपजिल्हाधिकारी श्रद्धा जाधव यांना निवेदन दिले.
तसेच म.ग्रा.रो.ह.यो अंतर्गत 3 महिने लोटूनही अजून पर्यंत मजुरांना त्यांच्या कामाची मजुरी मिळालेली नाही.
त्यासाठी सुद्धा उपजिल्हाधिकारी श्रद्धा जाधव तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, सुखराम बन्सोड, देवेंद्र पातोळे, घनश्याम भैसारे, विष्णू मानकर, जीवन नेवारे, गोवर्धन डुंबरे, गिरीधर तिडके, राजकुमार नेवारे, दुलीचंद गोंधळे उपस्थित होते.