रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- तालुक्यातील हरणी येथील रहीवासी रामभाऊ नथ्थू गभणे वय ५० वर्ष या – शेतकऱ्याने १२ ऑगस्टला सांयकाळी ५.३० वाजता स्वतः चे शेतामधील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे घटना घडली.
सवीस्तर वृत्त असे कि,रामभाऊ गभणे हे मुळचे हरणी येथील रहीवासी असुन नेरी येथे आपल्या परीवारासहीत राहत होते.१२ आगस्टला हरणी येथील शेतावर गेले होते.
पण सायंकाळच्या सुमारास ५.३० वाजता शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवीली.घटनेची माहीती चिमूर पोलीसांना कळताच घटनास्थळी पोहचुन घटनेचा पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणीसाठी उपजील्हा रूग्णालय चिमूर येथे पाठवीण्यात आले.
रामभाऊ गभणे यांच्या कुटुबांत पत्नी, मुलगा – मुलगी आहे त्यांच्या आत्महत्येचे कारण अजुन काही समजु शकले नसुन पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.