ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली : नंदलाल पाटील कापगते विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय साकोली येथे सत्र 2024 – 25 करिता शालेय मंत्रिमंडळ लोकशाही पद्धतीने गुप्त मतदान करून गठीत करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनामध्ये लोकशाहीचे बीज रुजावे, राजकीय इच्छाशक्ती निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमधून चांगले राजकारणी घडावेत, विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्येच निवडणुकीचा अनुभव यावा या सर्व गोष्टीच्या उद्देश समोर ठेवून विद्यालयात नाविन्य उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांना निवडणूक आवेदन पत्र भरणे, आवेदन पत्राची छाननी करणे, उमेदवाराने निवडणुकीचा प्रचार करून निवडणूक लढविणे. ईव्हीएम वोटिंग मशीन द्वारे प्रत्यक्ष उमेदवार फोटोसह यादी तयार करून घेतली. मतदान करण्यापूर्वी उमेदवारांना माॅकपोल करून दाखविण्यात आले.
बॅलेट दिल्यानंतर पसंतीच्या उमेदवाराच्या पुढील बटन दाबल्यावर हिरवा लाईट लागतो आणि विशिष्ट आवाज येतो त्याच्या प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण होता. विद्यार्थी खूप उत्सुकतेने या प्रक्रियेत सहभागी झाले होते. शाळेतील एकूण 820 विद्यार्थ्यांनी मतदान केले. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार तीन बुथ ची व्यवस्था करण्यात आलेली होती. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बोटावर मार्कर पेनने शाई लावण्यात आलेली होती.
उमेदवार प्रत्येक वर्गामध्ये जाऊन उमेदवार प्रचार करताना मी तुमच्यासाठी काय काम करेन? याची आश्वासक यादी सर्व विद्यार्थ्यांना सांगत होते. त्यानंतर दोन दिवसांनी निवडणुकीच्या निकाल सर्व विद्यार्थ्यांसमोर जाहीर करण्यात आले.
यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी – अमन खडसे, विद्यार्थिनी प्रतिनिधी – कु आचल बिसेन, स्वच्छता प्रमुख – कु. मेघा लंजे ,कु.जिया मसराम, सांस्कृतिक प्रमुख- कु. भैरवी भेंडारकर, कु. सोनिया कापगते, विज्ञान प्रमुख- हेमंत कापगते, कु. तेजस्विनी देशमुख, पर्यावरण प्रमुख – कु. अनिता घरात, सुहास बोरकर, आरोग्य प्रमुख- कु. चारू कापगते, विजय कापगते, सहल प्रमुख- कु.आदिती सोनवणे, कु. सायना पठाण अशाप्रकारे लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ गठित करण्यात आले.
निवडणूक निकालानंतर सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष करून गुलाल उधळून आनंद साजरा केला. निवडून आलेल्या सर्व शालेय मंत्रिमंडळाचे पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापिका श्रीमती रसिका कापगते यांनी अभिनंदन केले.
सदर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. एस.बोरकर, एस.आर. देशमुख ,डी.डी.तुमसरे, आर.सी.बडोले, डी.आर. देशमुख ,एम.एम.कापगते, एस.व्ही.कामथे, एल.एस. गहाणे, आर. व्ही. दिघोरे सोनाली क-हाडे, मीना शिवणकर, प्रा. स्वाती गहाणे, प्रा. रविता बोरकर, प्रा. भूमिका कापगते, प्रा. भावना गहाणे, प्रा. प्रकाश बोरकर व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.