झाडे ही पृथ्वीची शोभा आहे प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात झाडे लावली पाहिजे – पोनि उमेश पाटील… — कामगार कल्याण केंद्र द्वारे पो स्टे परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी 

       कन्हान : – कामगार कल्याण केंद्र कन्हान द्वारे कन्हान पोलीस स्टेशन परिसरात विविध प्रकारचे वृक्ष लाऊन वृक्षारोपण कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला.

            महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक एक नागपूर अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कन्हान द्वारे सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड, गटअधिकारी सौ.प्रतिभा भाकरे यांचा मार्गदर्शनात शुक्रवार दि.(१२) जुलै ला दुपारी कन्हान पोलीस स्टेशन नवीन बिल्डिंग परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

         कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक उमेश पाटील , प्रमुख पाहुणे रिता बर्वे ( महिला कांग्रेस आघाडी अध्यक्ष), ऋषभ बावनकर सह आदिंच्या हस्ते विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले.

         यावेळी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी झाडे ही पृथ्वीची शोभा आहे, प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात झाडे लावली पाहिजे असे नागरिकांना आव्हान केले. जीवन जगण्यासाठी आवश्यक हवा आणि प्राणवायु आपल्याला झाडापासुनच मिळतो असे काग्रेस महिला आघाडी अध्यक्ष रिता बर्वे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांनी संबोधित केले. 

           कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन कन्हान शाखा कल्याण केंद्राचे अधिकारी सौ.रंजना पवनीकर यांनी केले.

         या प्रसंगी पोलीस हवालदार नरेश श्रावणकर , अमोल नागरे, दिपक कुंभलकर , ओम यादव महिला कर्मचारी नालंदा पाटील, प्रेमा कावळे सह आदि नागरिक उपस्थित होते.