प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीने 15 जुलै ला भंडारा येथे बैठकीचे आयोजन…

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक

दखल न्युज भारत

         साकोली – प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीने 15 जुलै ला शासकीय विश्राम गृह भंडारा येथे दुपारी 12 वाजता परमानंद मेश्राम सामाजिक चळवळीचे नेते यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

        भंडारा  जिल्ह्यात सन २०२१ पासून कलावंत मानधन निवड समिती नसल्याने अनेक कलावंत ठरवून दिलेली वयाची अट पूर्ण करूनही मानधनापासून वंचित आहेत.

              राज्यात विविध क्षेत्रातील कलावंत यांची वयाची विशिष्ट अट पूर्ण केल्यानंतर राज्यशासनाच्या वतीने सरसकट ५००० रुपये मानधन दिले जाते. यासाठी पंचायत समिती मार्फत प्रस्ताव पाठविले जातात. आतापर्यंत अनेक प्रस्ताव पाठविले गेले आहेत.परंतु २०२१ पासून जिल्ह्यात कलावंत मानधन निवड समिती नसल्याने कलावंतांच्या फाईल कार्यालयात धूळ खात पडलेल्या आहेत.

        प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्हा यांच्या वतीने  जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, पालकमंत्री यांना निवेदन देऊन सुद्धा अजून पर्यत ही कलावंत निवड समिती तयार करण्यात आली नाही. त्यामुळे ३ वर्षांपासून प्रलंबित असलेली कागदपत्रे सहित कलावंताची फाईल पंचायत समिती, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग मध्ये पडून आहेत.

         त्यासाठी संघटनेच्या वतीने काही उपाययोजना किंवा संगीतमय आंदोलन करावे लागणार काय या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तरी जिल्ह्यातील वृध्द मानधन साठी ज्यांनी फाईल पंचायत समिती ला दिली आहे असे कलावंत व सर्वस्तरीय कलावंतांनी बैठकित उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले, भंडारा तालुका अध्यक्ष सुशील सद्धर्मी, सुरेंद्र उके, सोमप्रभू तांदुळकर, गणेश आथिलकर,रवी बाबू कव्वाल, अक्षय मेश्राम, हितेश पाटील, कलाकार खोब्रागडे, गीता रामटेके,साकोली अध्यक्ष मनोज बोपचे, संजय टेम्भुरने, यशवन्त बागडे, धनंजय धकाते, ईश्वर धकाते, उमेश भोयर, मनोज कोटांगले, तिर्थानंद बोरकर,भूमालाताई उईके, प्रतिभा साखरे, लाखनी अध्यक्ष संतोष फसाटे,आदेश खेडीकर, भुपेश ढेंगे, शिवा मेश्राम, विनोद लांडगे, तुमसर अध्यक्ष नाना ठवकर, प्रकाश वंजारी, श्रीकांत तुमसरे, रोशन राखडे, मोहाडी अध्यक्ष रवी ठवकर, भगवान राऊत, प्रकाश तितिरमारे, लाखांदूर अध्यक्ष स्वप्नील बन्सोड, जितू बांगरे, पवनी अध्यक्ष लक्ष्मीकांत मेश्राम, विजय महानंदे, महेंद्र गोंडाने यांनी केले आहे.