उपसंपादक/अशोक खंडारे
चामोर्शी तालुका मुख्यालयापासून १४ की,मी .अंतरावर असलेल्या रश्मीपूर पर्यंत डांबरीकरण केव्हा होणार असा प्रश्न परीसरातील नागरिकांना पडला आहे.
चामोर्शी ते कृष्णनगर ते कोनसरी ह्या मार्गावर अनेक खेडेगाव असून तालुक्याच्या ठिकाणी शासकीय,निमशासकीय, कामाकरिता दररोज नागरिकाना ये – जा करावे लागते परंतु सदर मार्गाची अनेक वर्षापासून कोणत्याही प्रकारची दुरुस्तही केलेली नसल्यामुळे हा मार्ग पूर्णतः खड्डेमय झालेला होता व नागरिकानां बराच मनस्ताप सहन करावा लागला. या गभीर समस्येची दखल घेत रश्मीपूर येथील युवावर्गानी हेमंतकुमार कुमरे यांच्या नेतृत्वात राजू कोडापे,निलेश कुळमेथे, नामदेव सेडमाके, एकनाथ मडावी,गणेश तोडसाम, परशुराम तोडसाम, नितेश आत्राम,शुभम कोडापे,गुरुदास आत्राम,कोमल परचाके, भास्कर राउत,संजय कुळमेथे, प्रदीप नैताम, सुरज वेलादी,नागेश आत्राम व गौरव वेटकर यांनी सबंधित मार्गाविषयी सा,बा. विभाग क्र २ गडचिरोली यांचेकडे रीतसर पाठपुरावा केला. सध्या स्थितीत कोनसरी पासून रोडचे डांबरीकरण हे रश्मीपूर पर्यंत १४ की.मी.पूर्ण झाले आहे. व रश्मीपूर ते चामोर्शी पर्यंत १४ की.मी.चे काम अपूर्ण आहे .सदर काम मंजूर असुनही काम पूर्ण करण्यात दिरंगाई होत आहे तर शासकीय बांधकाम विभाग यांनी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे धाडस दाखवले तर परीसरातील जनतेला सोईचे होईल.