अहेरी उपविभागातील विविध समस्या सोडविण्यासाठी संदिप कोरेत यांचे पालकमंत्र्यांना साकडे..

रमेश बामणकर 

गडचिरोली:- देवेंद्र जी फडणविस उपमुखमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली हे जिल्हा दौऱ्यावर आले असता आपल्या उपविभागातील ज्वलंत समस्या एटापल्ली तालुक्यातील सूरजागड प्रकल्पात स्थानिकांना रोजगार, अहेरी तालुक्यातील आल्लापल्ली ते लगाम महामार्गावरील धूळी मुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, सिरोंचा तालुक्यातील मेडिगड्डा प्रकल्पामुळे होणारे नुकसान तसेच सिरोंचा ते आलापल्ली व आल्लापल्ली ते आष्टी रोड व ईतर विषया संबंधी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली यांना जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांच्या मार्गदर्शनात युवा नेता आदिवासीं आघाडी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष संदीप कोरेत यांनी निवेदन देऊन चर्चा केले. या वेळी एटापल्ली तालुका अध्यक्ष विजय नल्लावार सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.