अकोट प्रतिनिधी

 

 

श्री शिवाजी महाविद्यालय, दर्यापूर रोड, अकोट लगटचा व खाई नदीला लागून असलेला वडिलोपार्जित शेत रस्ता हा पुराच्या पाण्यामुळे व पाऊसामुळे वर्ष दर वर्ष खचत चालला होता, त्यामुळे त्या शेत रस्त्यावरील सर्वच शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा दरवर्षी सामना करावा लागत होता.

विविध पदाधिकारी तसेच नेतेमंडळीना पुर संरक्षक भिंत व रस्त्या बाबत अनेक वेळा निवेदन करून सुद्धा स्वतंत्रकाळा पासून अस्तित्वात असलेल्या रस्त्याला व पुर संरक्षक भिंतिला मुहूर्त मिळत नव्हते, तेव्हा स्वयंप्रेरणेने व शेतकऱ्यांच्या स्वखर्चातून सदर रस्ता व पुर संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय सदर शेतकऱ्यांनी घेतला व त्या नुसार न. पा.अकोट यांची रितसर परवानगी घेऊन आज सागर विनोदराव अंबडकार व सुनिल अंबडकार, संजय शेंडोकार,श्रीराम मलधुरे, श्याम रोही, सुनिल काळे, किशोर बेलसरे, कृष्णा भोरखडे, वैभव इंगळे, राहुल इंगळे, आशिष नवले, रामदास नाथे, दत्तात्रय रोही, सचिन बेलोकर, राजीव साळुंके, रवींद्र केवटी, अरविंद हाडोळे, गजाननराव इंगळे, नितीन जुनगरे, नितीन बनसोड, गजानन नवले, अशोक नाथे, अशोक अडोकार, शेषराव उपासे, दिपक कळमकार, सुरेश बोरोडे, दुर्गेश गणगणे, आशिष देवरे, संतोष नाथे, अमोल निमकर, मुन,राकेश डांगरे व तसेच समता परीषद व क्रंतियुवा गृपचे असंख्य पदाधिकारी सुद्धा हजर होते.

ह्या संपूर्ण शेतकऱ्याच्या उपस्थितीत डॉ. सौ. मेघना वासनकर , मुख्याधिकारी अकोट यांच्या शुभहस्ते आज भूमिपूजनाचा कार्यक्रम अत्यंत आनंदाने पार पडला.

त्यावेळेस संपूर्ण शेतकऱ्यांनी मुख्याधिकरी यांचे रितसर परवानगी मिळवून दिल्याबद्दल आभार मानले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com