चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
भंडारा:- जिल्ह्यात दोन दिवस सतत मुसळधार पाऊस पडल्याने वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे. जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्वच्या सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे.
या पैकी २८दरवाजे अर्ध्या मीटर ने उघडले असून ५दरवाजे १मीटरने उघडण्यात आले आहे. या दरवाज्या मधून ४२८६.७क्युसेक प्रती सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात जर आणखी मुसळधार पाऊस कोसळल्यास आणखी दरवाजे उघडण्यात येणार त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.