अकोट प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग(बार्टी),पुणेच्या समतादुत प्रकल्पाच्या र्वलिने जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश अण्णाजी गाढवे (बार्टी),पुणे यांनी केले.
कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख मार्गदर्शक प्रा.शिकांत जनगमवार (तपस्वी रामराव महाराज कॉलेज,पोहरादेवी, ता.मानोरा,जि. वाशिम) त्यांनी जागतिक लोकसंख्या वाढीचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.विजय धों.जितकर(विधी सेवा समिती सदस्य)शिवाजी ज्यु.कॉलेज आकोट जि.अकोला त्यांनी जागतिक लोकसंख्या वाढीमुळे भुकबळी, कुपोषण, बेरोजगारी या समस्या दिवसे न् दिवस जगात वाढत असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रकाश गाढवे (सा.न्याय विभाग,बार्टी) पुणे त्यांनी लोकसंख्या वाढीमुळे सामाजिक समस्या,आरोग्य विषयक समस्या,माणसिक समस्या, अन्नधान्याची कमतरता निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले.तसेच बार्टीमार्फत आयोजित अनु.जiतीकरिता स्पर्धा परिक्षा,बॅकीग परिक्षा,एलआयसी प्रशिक्षण फॉम संदर्भात माहिती दिली. विद्याथ्र्यानी मोठ्या प्रमाणात या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रांजेद्र शिंदे (राज्यशास्त्र विभाग प्रमुख)कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,शंकरनगर ता. बिलोली,जि.नांदेड त्यांनी लोकसंख्या वाढीची जागतिक कारणे व परिणाम या विषयी माहिती दिली.लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी समाज जागृती आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. या प्रसगी राहुल कऱ्हाळे(प्रकल्प अधिकारी) बार्टी, पुणे यानी प्रास्ताविक केले. मान्यवरांचे आभार कु.कांचन भरणे यांनी मानले.यावेळी मोठया संख्येने नागरिक, विद्यार्थी,उपास्थित होते.