अकोट प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर ह्यांचे संकल्पनेतून अकोला जिल्हा पोलीस दलांतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनचे कामकाजात सुधारणा होऊन जनतेस गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान होण्याचे दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे कार्यमूल्यांकण करण्यात येते. सदरचे कार्यमूल्यांकणात गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण, प्रलंबित गुन्ह्याची निर्गतीचे प्रमाण, गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण, अवैध व्यवसायांवर कार्यवाही, हरवलेल्या व्यक्तींचा शोध, समन्स वॉरंट बजावणी इत्यादी बाबींवर गुण देऊन पोलीस स्टेशनचे मासिक कार्यमूल्यांकण केले जाते. त्यामध्ये ग्रामीण विभागातून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचा मार्च २०२२, एप्रिल २०२२, मे २०२२ व जून २०२२ अश्या चार महिन्यांमध्ये सलग प्रथम क्रमांक आला आहे. त्या करिता पोलीस अधीक्षक जी. श्रीधर ह्यांनी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितिन देशमुख व पो स्टे अकोट ग्रामीणचे स्टाफचे प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले आहे.