पारशिवनी : दिंनाक १३/७/२०२२.
नागपूर जिल्ह्य़ातील पारशिवनी तालुक्यातील पेंच धरणाचे १६ ही 0.5 मिटर ने दरवाजे खुले करण्यात आले आहे. त्यामुळे कन्हान नदी व पेंच नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात नदी ला पाणी वाहून जात आहे. त्यामुळे पेंच नदीच्या काठावर असलेल्या गावांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी दिलेल्या सुचनाचे पालन करावे व खबरदारी घेण्याचे आव्हान. पारशिवनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केले आहे.
मध्यप्रदेशातील पाण्याचा मोठा विसर्ग होत आहे. व अतिवृष्टी मुळे पेंच जलाशयाचा जल साठ्यातील पाणी वाढून धरण 96.00%भरले असून अतिरिक्त पाणी धरणाच्या १६ दरवाजातून आज सकाळी 0.5 फुटाने खोलुन नदी पत्रात पाण्याचा विसर्ग आज दिनांक १३ जुलै ला सकाळपासून सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पेंच नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे पुराचा इतर गावाना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसे बनरा नरहर सुवर धरा कोलित मारा टोली आमगाव व वराडा जुनी कामटी गाडघाट कुवारा भिवसेन २ तुवरधरा नयाकुड बखारी करंभाज बिटोली पिपळा गरं डा गवना चा संपर्क तुटला आहे म्हणुन खबरदारीचा इशारा नागरिकांना दंवडी व्दारा देण्यात आला आहे. असी माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली.
तर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने प्रक्षिशीत चमू सह. पारशिवनी पोलीस निरीक्षक राहूल सोनवणे , कन्हान पोलिस निरिक्षक विलास काळे, गट विकास अधिकारी अशोक जाधाव मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल पोलिस पाटिल यांच्या पोलीस कन्हान व पारशिव नी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी न घाबरता दिलेल्या सुचनाचे काटेकोर पणे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केले आहे.
पेंच नदी वरील घोंगरा महादेव पर्यटन स्थळ व कुवारा भिवसेन देवस्थान पाण्याखाली पेंच नदीच्या पात्रात असलेले पारशिवनी जवळील पर्यटकांना आकर्षित करणारे घोंगरा महादेव तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ पेंच जलाशयाच्या पाण्याच्या विर्सगाने पाण्याखाली आल्याने पर्यटकांसाठी हे स्थळ पुर्ण पने प्रतिबंधीत करण्यात आले आहे.