युवराज डोंगरे/खल्लार
सरकारी नोकर हे जनतेचे सेवक असतात. मात्र ही गोष्ट तलाठी कळाशी येथील तलाठ्याबाबत एकदम फेल ठरत आहे.
कळाशी येथील तलाठी म्हणून विनोद गवई हे काम सांभाळत असून गवई यांना नेमून दिलेल्या वेळेत गावात हजर राहणे आवश्यक आहे परंतु या विपरीत परिस्थितीत कळाशी-सुजापूर या गावांमध्ये दिसत आहे.
कळाशी येथील तलाठी विनोद गवई गावाच्या ठिकाणी तर दिसतच नाहीत ना ते त्यांच्या कार्यालयात असतात.
कळाशी येथील तलाठी यांना गेल्या कित्तेक दिवसापासून नागरीकांनी गावात पाहिलेले नाही.
शेतकऱ्यांना कुठलेही काम पडले तर शेतकऱ्यांना जावं लागतं तलाठी महोदय यांच्या घरी तलाठी यांचा शोध घ्यायला.
शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टी साठी दाखल्यांसाठी वणवण तलाठी यांना शोधत फिरावं लागत. जनतेचेच सेवक जनतेचेच हाल करतात.
तलाठी आता गावात दिसण खूप दुर्लक्ष झाले आहे. तलाठी यांना शोधण्यासाठी शेतकरी वर्गाला शारीरीक आणि मानसिक हालपेष्टा सहन करावे लागत आहे.
एवढा त्रास सहन करून पण तलाठी काही भेटत नाही.
तलाठी येतात कधी जातात कधी कोणालाच माहीत नाही राहत. गावात पिकांचे सर्वे कधी आहे, कधी झाला हे सर्व सामान्य माणसाला याची काहीच माहिती नसते. जनतेचे, शेतकऱ्यांचे होत असलेले हाल पाहून ग्रामपंचायत सदस्य अभिषेक गावंडे यांनी कळाशी येथील जनतेला त्रास कमी व्हावा आणि जनतेला न्याय मिळावा जनतेला आवश्यक कागदपत्रे योग्य वेळेत मिळावे त्यासाठी मा.तहसीलदार यांना निवेदन दिले.
निवेदनात कळाशी येथील तलाठी दौरा, बैठकांचे सूचना फलक लावावे, कर्तव्ये व जबाबदाऱ्या, सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निवासस्थानी राहावे, तलाठी यांनी शेतजमीनी, पिकपहाणी संबंधित शेतजमीनी भेटी बाबत चा तपशील जाहीर करावा. विविध दाखले देताना शासनाने आकारलेल्या दरांची दर सूची कार्यालयात लावावी. या सूचना तलाठी यांना देण्यात याव्यात अशी विनंती तहसीलदार यांना केली. या पुढे तलाठी यांनी गावात संपूर्ण वेळ हजर राहून जनतेची सेवा न केल्यास त्याच्या घरा समोर आमरण उपोषण करू असा इशारा ही देण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अभिषेक गावंडे, अमोल राऊत,धनंजय पवार, श्रीकांत ठाकरे, गौरव वेलकर आदी उपस्थित होते.