चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
भंडारा (साकोली):- कलाबाई कन्या विद्यालय साकोली येथील सभागृहात व्यास पुजेचा कार्यक्रम आज दिनांक १३/०७/२०२२ला साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी बी चोले प्रमुख पाहुणे आर बी ईसापुरे, चेतक हत्तीमारे, एस एस झींगरे, एम आर राऊत, उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व ओंकार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुजा करण्यात आली. यावेळी पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुछ देऊन करण्यात आले. सदर कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर उपस्थित विदयार्थ्याना आर बी ईसापूरे यांनी गुरुचे महत्व काय असते हे महर्षि व्यास याची गोष्ट सांगून पटवून दिले. तसेच प्रमुख पाहुण्याने सुदधा गुरुचे महत्व व स्थान या विषयावर प्रकाश टाकला. तसेच अध्यक्षिय भाषणातून प्रा. पी बी चोले यांनी भारतीय संस्कृती मध्ये गुरुला देवाचे स्थान आहे. सर्वात प्रथम गुरु म्हणजे आईबाबा .आपल्या शालेय जीवनात आपले शिक्षक तसेच प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारा व्यक्ती म्हणजे गुरु असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन चेतक हतीमारे यांनी केले तर आभार मीनाक्षी राउत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेचे शिक्षक, कुंभरे, माटूरकर तसेच शिक्षकत्तेर कर्मचारी वलथरे,भुरे व विद्यार्थिनींनी योगदान दिले .