चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
भंडारा(साकोली):- आज दि. 13/07/2022 रोजी नवजीवन विदयालय अॅन्ड ज्युनि. सायन्स कॉलेज जमनापूर / साकोली येथील मुख्य दालनात व्यास पुजेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. लोकानंद नवखरे प्रमुख पाहुणे प्रकाश बडवाईक, दिलिप चौधरी, मुकेश येसनसुरे विनोद किरपान, सत्यवान निपाने, अल्का गोंधळे, चंद्रकला बिसने, उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व ओंकार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुजा करण्यात आली. यावेळी पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुछ देऊन करण्यात आले. सदर कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर उपस्थित विदयार्थ्याना दिलिप चौधरी, यानी गुरुचे महत्व काय असते हे महर्षि व्यास याची गोष्ट सांगून पटवून दिले. तसेच प्रमुख पाहुण्याने सुदधा गुरुचे महत्व व स्थान या विषयावर प्रकाश टाकला. तसेच अध्यक्षिय भाषणातून डॉ. लोकानंद नवखरे यांनी भारतीय संस्कृती मध्ये गुरुला देवाचे स्थान आहे. सर्वात मोठा गुरु म्हणजे निसर्ग होय.
कार्यक्रमाचे संचालन सौ. अर्चना नवखरे यांनी केले तर आभार अमोल वाकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेचे शिक्षक, प्रिती साखरे, रजनी इलमकर पूजा कापगते, तसेच शिक्षकत्तेर कर्मचारी मुन्नेश्वर करंजेकर राकेश चकोले सुरज नंदेश्वर हेमराज सयाम, प्रमोद डोंगरवार व विद्याथ्र्यांनी योगदान दिले |.