प्रतिनिधी:- निलेश आखाडे
श्रीराम एज्युकेशन सोसायटी च्या परांजपे मोतीवले हायस्कूल,खेंड येथे बालवाडी,शिशुविहार लहान गट तसेच मोठा गटाच्या चिमुकल्याणी आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली. यामध्ये सर्व चिमुकल्यानी संतांची तसेच वारकऱ्यांची वेशभूषा केली होती.वारकरी वेशभूषा मध्ये कोणी खांद्यावरती पालखी घेऊन तर कोणी डोक्यावरती तुळस घेऊन शाळेमध्ये चिमुकल्यांची विठू नामाच्या गजरात भजने गात वारकरी दिंडी काढण्यात आली.यामध्ये सर्वच लहान मुलांनी उपस्थितांची मने जिंकली.सर्व लहान चिमुकल्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल रेळेकर,सौ.बाग्वे मॅडम यांच्यातर्फे खाऊ वाटप करण्यात आला.सदर उपक्रमांतर्गत संतांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातील लहान चिमुकल्याणमध्ये वारकऱ्यांप्रती नक्कीच प्रेम भावना निर्माण होईल असे उद्गार यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल रेळेकर यांनी बोलताना काढले.यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. केळकर मॅडम तसेच प्राथमिक वर्गाच्या सर्व शिक्षिका वर्ग उपस्थित होत्या.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिशुविहारच्या सौ.बाग्वे मॅडम तसेच बडदे मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले.
-दखल न्यूज, भारत