वणी : परशुराम पोटे
भारत स्वाभिमान ट्रस्ट व पतंजली योग समिती वणी यांचे वतीने दिनांक १३ जुलै ला गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. महादेव खाडे तर प्रमुख पाहुणे रामराव गोहोकार, लक्ष्मण इद्दे, गुलाब निते, सुधाकर गारघाटे, सौ.विजयाताई दहेकर, सौ. मायाताई माटे, सौ. लताताई थेरे ई. हजर होते. यावेळी प्रार्थना, गुरूवंदना,भजन घेण्यात आले.
गुरूपाैर्णिमेचे महत्व ,गुरू शिष्य परंपरा, आधुनिक काळातील गुरूचे महत्व ,गुरूची आवश्यकता ई. बाबत प्रा. महादेव खाडे, लक्ष्मण इद्दे, गुलाब निते,सुधाकर गारघाटे,विजयाताई दहेकर यांनी मार्गदर्शन केले.
संचलन वसंतराव उपरे यांनी करून आभारप्रदर्शन राजकुमार पाचभाई यांनी केले. यावेळी वणी शहरातील विविध ठीकाणी सुरू असलेल्या नियमित वर्गातील योगसाधक हजर होते.