पारशिवनी :- तालुका तिल पो.स्टे . कन्हान अंतर्गत २ कि.मी. अंतरावरील रॉयनगर कन्हान येथे दिनांक ० ९ / जुलाई२०२२ चे सकाळी १०.०० वा . १०.३० वा . दरम्यान तक्रारदार विनोद वामनराव हूमने वय ५२ वर्ष , रा . रॉयनगर कन्हान हे घरी हजर असतांना त्यांना अज्ञात आरोपीने फोन करून म्हटले कि , ‘ क्रेडिट कार्ड वापरत नाही , क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे का ? तेव्हा तक्रारदार ने क्रेडिट कार्ड बंद करण्यास सांगितले असता आरोपीने टेक्स मॅसेज पाठविले ते टेक्स मॅसेज डॉउनलोड केले व ओटीपी पाठविले असता तक्रारदारचे अकाउंट मधून १,७३,००० / – रू . ऑनलाईन पद्धतीने काढुन घेत तकरारदार ची फसवणुक केली.
सदर प्रकरणी तक्रारदार विनोद वामनराव हुमने यांचे रिपोर्ट वरुन पो.स्टे . कन्हान येथे अज्ञात आरोपी विरुध्द अपराध क्रमाक४१०/२२ अन्वये कलम ४२० भादवी सहकलम ६६ ड माहिती तंत्रज्ञान अधीनियम अन्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीचा शोध घेणे सुरु आहे .
सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री विलास काळे हे करीत आहे .