
युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
युवासेना प्रमुख, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस युवासेना मार्फत दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून जसे की रक्तदान शिबिर, सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांना फळ वाटप करणे, अंध विद्यालय मध्ये जेवण देणे, शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू देणे इत्यादी उपक्रम राबवून दरवर्षी साजरा केला जातो.
त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस दर्यापूर शहरामधील विविध स्मशानभूमींमध्ये 100 वृक्षांचे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यामध्ये बहुगुणी उपयोगी वृक्षांची लागवड केली. यावर्षी स्मशानभुमी मध्ये वृक्षारोपन करण्याचे उद्देश हा की स्मशानभुमीत सावलीची व्यवस्था होईल, शांतता राहील,सौदर्यात भर पडेल हा आहे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर वडतकर, जिल्हा चिटणीस प्रतीक राऊत, तालुकाप्रमुख सागर गिर्हे, विधानसभा समन्वयक पंकज राणे, भरत हिंगणीकर, मनोज लोखंडे, प्रशांत धर्माळे, भूषण गावंडे, आशिष लायडे, राज गुजराती, गणेश खंडारे, नितीन माहुरे तसेच युवासैनिक उपस्थित होते