पालखी सोहळ्यातील दिंड्यांना काळे परीवारांकडून शिधा वाटप… — स्व.पार्वतीबाई काळे यांच्या पंचम पुण्यस्मरणदिन साजरा…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांच्या मातोश्री स्व.पार्वतीबाई देवराम काळे यांच्या पंचम पुण्यस्मरण दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील काही दिंड्यांना शिधा वाटप करण्यात आला.

         तसेच पंढरपूर येथे बांधण्यात येणाऱ्या चऱ्होली बुद्रुक या गावाच्या धर्मशाळेसाठी व वडगाव शेरी येथील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी देणगी प्रकाश काळे यांच्या माध्यमातून देण्यात आली.

        प्रकाश काळे परीवाराच्या वतीने स्व.पार्वतीबाई देवराम काळे यांच्या पंचम पुण्यस्मरण दिनानिमित्त माई माऊली पुरस्कार माऊली भक्त श्रीमती सुमन सरनाईक यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पुण्यस्मरण दिनानिमित्त हभप भागवत महाराज साळुंके यांचे आईच्या जीवनावर प्रवचन सेवा संपन्न झाली.

          यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश वडगांवकर, सुरेश तापकीर, सचिव अजित वडगांवकर, विश्वस्त दिपक पाटील, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, विलास वाघमारे, विश्वंभर पाटील, श्रीधर सरनाईक, प्राजक्ता हरफळे, बापूसाहेब गोरे, ज्ञानेश्वर मोळक, आत्माराम महाराज शास्त्री, राजाभाऊ चोपदार, राधाकृष्ण गरड, संकेत वाघमारे, सचिन काळे, बंडुनाना काळे, दिपक काळे, धनाजी काळे उपस्थित होते.