(1) ही अनियंत्रीत महागाई माझ्यावरच का….?
(2) किमान माझ्यावर आलेल्या संकटाचा उपाय आणि प्रयत्न माझ्या हातात आहेत का?
असतील तर कोणते असतील? नसतील तर का नाहीत?
(3) का सर्वच प्रश्न राजकीय इच्छाशक्तीवरच अवलंबून आहेत का?तसे असेल तर मी केवळ या राजकारण्यांचा कार्यकर्ता किंवा अनुयायी म्हणूनच कठपुतळी म्हणून जीवन जगावे का?
(4) तसेच असेल तर माझ्या सदविचारी बनण्याचा,शिक्षणाचा उपयोग काय?केवळ शिक्षणातून स्वार्थ साधला म्हणून जग जिंकल्याच्या आनंदात मी मानसिक गुलामीचे जीवन व्यतीत कसरण्याचा असुरी आनंद घ्यावा का?
(5) तसे असेल तर महापुरुष, तत्वत्वेत्ते, यांचे स्थान केवळ प्रतिमा आणि स्मारकातच बंदिस्त होण्यासाठीच त्यांचा जन्म त्याग, संघर्ष आणि समर्पनात झाला होता का?
(6) या महामानवांनी आमच्या ( सर्वसामान्य जनतेच्या ) कायमस्वरूपी सुखासाठी स्वतःचे सर्वस्व बलिदान व योगदान देऊन जे आम्हाला सुखी केले. त्यांच्या त्यागाचा, संघर्षाचा विचार आम्ही कर्तव्यातून जागृत होऊन कधी करणार का?
(7) आमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण संविधानात असतांना आम्ही इकडे तिकडे उगीचच नशिबात, देवात का शोधत बसतो? त्याचा प्रत्यय आपण कोरोनाच्या लाटेत घेतलेला असतांना सुद्धा आम्ही अजूनही जमिनीवर का आलो नाही?
(8) लोकशाहीत जगाचे प्रश्न सोडविण्याची शक्ती असतांना आणि संविधानात तर सर्व भारतीयांचे प्रश्न सोडविण्याची शक्ती असतांना जगाच्या तुलनेत आमची लोकशाही सर्वात मागे पडली आहें, याचे भान जनतेला आणि कुणालाही अजूनही का आले नाही.?
(9) केवळ भौतिक सुखाच्या शारीरिक गरजा भागणे म्हणजे विकास झाला ही विकासाची अर्धवट व्याख्या आहें. सदसदविवेक बुद्धी जागृत होऊन संपूर्ण सजीव सृष्टीचे कल्याण साधने ही पूर्ण विकासाची व्याख्या आहें. या दिशेने आम्ही प्रवास कधी करणार?
(10) साम,दाम,दंड आणि भेदाच्या कुटनीतीच्या समीकरणाने आमच्या मानवतेचे,जगाचे,देशाचे,राज्याचे,समाजाचे,नातेवाईकांचे,कुटुंबाचेबहीण – भावाचे,आई – वडिलांचे, एवढेच काय एका शरीराचे सुद्धा भेद करून अनेक भाग केले……!
अशा कूटनितीवर आधारलेल्या राजकारण्यांच्या,राजकीय पक्षांच्या,शक्तीला विवेकाने नामोहरम करण्याची वेळ आलेली असतांना आम्ही बघ्याची भूमिका का घेतो…..?
वरील सर्व आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या आकलन क्षमतेनुसार शोधावी आणि जागृतीतून कर्तव्याने सिद्ध व्हावे….
अन्यथा आलेल्या व येणाऱ्या कृत्रिम विनाशाला बळी पडावे आणि भावी पिढीचे खुनी म्हणून सिद्ध व्हावे..
कारण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आमच्या मताचा अधिकार पूर्ण हिरावून घेऊन कूटनितीच्या बळावर EVM ने लोकशाहीला व संविधानाला पराभूत करून कूटनितीलाच विजय मिळवून दिला आहे……!
जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत आमचा मताचा अधिकार असणार नाही.म्हणून गेल्या 20 वर्षांपासून आमची लोकशाही केवळ निवडणुकीपुरतीच मर्यादित आहें. आणि संविधान केवळ मुखपृष्ठच्या सुशोभीकरणासाठीच आहें.
वरील प्रश्नांची उत्तरे शोधूया..
आवाहनकर्ता
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689..